फुलन देवीची काळीज चिरणारी जीवनकहाणी वाचताना आपण थिजून जातो!
फुलन देवीचा एकूण जीवनसंघर्ष खूपच दुःखद आहे१९७६ ते १९८३ या काळात चंबळच्या खोऱ्यात फुलनचं राज्य होतं, दहशत होती. फुलनचा बालपणापासून ते शत्रूच्या मनात धडकी भरवणारी डाकू इथपर्यंतचा प्रवास काळीज चिरणारा आहे. तो वाचताना आपण थरारून, थिजून जातो. या पुस्तकामधून आपल्या समाजाचा भयानक व कुरूप चेहरा समोर दिसतो. अनेक प्रश्न आपल्याला हे पुस्तक वाचत असताना पडतात.......